नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई

नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात एका घरातून 8 देशी बॉम्बसह बाॅम्ब बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. याप्रकरणी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. वैभव राऊत असं त्या व्यक्तीचं नाव असून महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई
SHARES

दहशतवाद विरोधी पथकानं (एटीएस) नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात एका घरातून 8 देशी बॉम्बसह बाॅम्ब बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. याप्रकरणी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. वैभव राऊत असं त्या व्यक्तीचं नाव असून महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.


आरोपी सनातनचा साधक?

आरोपी वैभव राऊत हा सनातनचा साधक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरूवारी मध्यरात्री एटीएसच्या पथकाने वैभवच्या घरी छापा टाकला. वैभव काही घातपात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसचे अधिकारी त्याच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवून होते. दरम्यान एटीएसने केलेल्या कारवाईत वैभवच्या घरात आणि त्याच्या दुकानात 8 जीवंत देशी बॉम्बसह बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी घातक सामग्री अधिकाऱ्यांना मिळून आली. याप्रकणी एटीएसने वैभवला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान आरोपी हा सनातनचा साधक नसल्याचा दावा सनातचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.


यामध्ये आणखी जणांचा समावेश?

हे काम एकट्याचं नसून त्याच्यासोबत नक्कीच अन्य काही जणांचा समावेश आहे. वैभवच्या चौकशीतून त्याचा सहभाग पुढे येण्याची शक्यता एटीएस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ताब्यात घेतलेल्या सामग्रीत गन पावडर आणि डिटोनेटर असून त्यांच्यापासून दोन डझन हून अधिक बॉम्ब बनवण्यात येऊ शकतात. डॉग स्कोड आणि फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे.

वैभव राऊत ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते. हिंदु जनजागृती समितीच्या सर्व हिंदु संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदु संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसंच आंदोलनांमध्ये वैभव सहभागी होत असत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता.  
- सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती 

'हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झालं आहे. वैभव राऊतची अटक ही ‘मालेगाव पार्ट २’ आहे की काय', अशी शंकाही सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा - 

दाऊदच्या मुंबईतील अखेरच्या संपत्तीचा लिलाव

सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्याचा हल्ला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा