सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्याचा हल्ला


सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्याचा हल्ला
SHARES

बीएमसीच्या जी नाॅर्थ विभागात पैशांच्या देवाणघेवाणीवरून सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्यानेच चाकू हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या प्रकरणी गजानन चव्हाण या कामगाराला अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत गायकवाड यांनी दिली.


उधारीच्या पैशातून वाद

पालिकेच्या जी नाॅर्थ विभागातील घनकचरा विभागात गजानन आणि पीडित महिला हे दोघेही एकत्र काम करतात. काही महिन्यांपूर्वी महिलेने आर्थिक अडचणींमुळे गजानन यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. मात्र, पीडित महिला वर्ष उलटूनही पैसे देत नव्हती. वारंवार मागूनही ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने गजाननचा राग अनावर झाला होता. गुरूवारी सकाळी दोघेही सकाळी ६.३० च्या सुमारास कामावर आले होते. त्यावेळी दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. याच वादातून गजाननने महिला स्वच्छतागृहात जाऊन महिलेवर चाकूने हल्ला केला. यावेळी पालिकेतल्या उपहारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने महिलेला वाचवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.  जखमी महिलेला सहकाऱ्यांनी तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात नेले.



हेही वाचा -

अंधेरीत गॅस गळतीमुळे घरात आग, ४ जण जखमी

भांडुपमध्ये ८ गांजा तस्करांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा