अंधेरीत गॅस गळतीमुळे घरात आग, ४ जण जखमी


अंधेरीत गॅस गळतीमुळे घरात आग, ४ जण जखमी
SHARES

अंधेरी पश्चिमेकडील विजय ट्यूशन चाळीतील एका घरामध्ये गॅसच्या गळतीमुळं आग लागल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी घडली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जण होरपळल्याचं समजतं आहे.

मंगेश शिंदे (४०) रमिला शिंदे (३७), वैजयंती शिंदे (६०) आणि रमेश पाताडे (५४) अशी त्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत मंगेश शिंदे आणि रमिला शिंदे ६० टक्के भाजल्याची माहिती कूपर रुग्णालयातील डॉ. मोरे यांनी दिली.

अंधेरीतील नेहरू नगरमधील विजय ट्यूशन चाळीतील एका घरात गुरुवारी संध्याकाळी ५. ४१ वाजेच्या सुमारास ही आग लागली. भारत गॅसच्या एलपीजी सिलिंडरमध्ये गळती झाल्याने ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. या आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी त्वरीत अग्निशमन दलाला कळवत शिंदे कुटुंबातील चारही जणांना कूपर रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.



हेही वाचा-

भांडुपमध्ये ८ गांजा तस्करांना अटक

कापड व्यापाऱ्याची धोपाटण्याने मारून हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा