घाटकोपर बॉम्ब स्फोटातील फरार आरोपीला १६ वर्षांनंतर अटक

याह्या शेख हा मूळचा औरंगाबादचा कैसर काॅलनी मिनार मस्जीद जिन्सी येेेेथील रहिवाशी असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. २००२ साली घाटकोपर येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात याह्या यानेच बॉम्ब असेंबल केला होता. त्यानंतर याह्या खान अब्दुल रहेमान शेख हा फरार झाला होता.

घाटकोपर बॉम्ब स्फोटातील फरार आरोपीला १६ वर्षांनंतर अटक
SHARES

घाटकोपरमध्ये २००२ साली झालेल्या बेस्ट बॉम्ब स्फोटातील फरार आरोपीला १६ वर्षांनंतर पकडण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. याह्या अब्दुल रहेमान शेख (४३) असं या आरोपीचं नाव असून अहमदाबाद येथे झालेल्या रेल्वे स्फोटातही त्याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. औरंगाबाद येथे नातेवाईकांना भेटायला आला असताना, गुजरात एटीएस आणि गुन्हे शाखेने केलल्या संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली.

याह्याला रविवारी अटक

याह्या शेख हा मूळचा औरंगाबादचा कैसर काॅलनी मिनार मस्जीद जिन्सी येेेेथील रहिवाशी असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. २००२ साली घाटकोपर येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात याह्या यानेच बॉम्ब असेंबल केला होता. त्यानंतर याह्या खान अब्दुल रहेमान शेख हा फरार झाला होता.

२००६ साली गुुुुजरातच्या अहमदाबाद परिसरातील काळूपूर रेल्वेस्टेशन जवळ रेल्वेत बाॅम्बस्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटातील फरार आरोपीला याह्या खाननेच बॉम्ब तयार करण्यासाठी मदत केल्याचं तपासात पुढे आलं. मात्र स्फोट होण्याच्या ४ ते ६ महिन्यांपूर्वीच याह्या खान अब्दुल रहेमान शेख हा दुबईला स्थायिक झाला.

रविवारी याह्या शेख दुबईहून नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादला आला असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाल्यानंतर गुजरात एटीएसने मुंबई गुन्हे शाखेच्या मदतीनं कारवाई करत याह्या शेखला अटक केली.

यांनी केली कारवाई

घाटकोपर स्फोटात २ ठार आणि ५० लोक जखमी झाले होते. दरम्यान गुन्हे शाखा १० चे पोलिस निरीक्षक आनंद भोईर, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत डोकेवार, पोलिस हवालदार श्रीधर चव्हाण, पोलिस शिपाई दिनेश परब यांच्या पथकाने याह्या अब्दुल रहेमान शेखला औरंगाबादहून अटक केली.

हेही वाचा-

जुईनगरमध्ये तलावात उडी मारून महिलेची आत्महत्या

२२ वर्षानंतर थापा टोळीतील गुंडास अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा