दाभोलकर, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून! सीबीआयचा दावा

डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांची हत्या एकाच पिस्तुलानं करण्यात आल्याचा दावा रविवारी सीबीआयने न्यायालयात केला. त्यामुळं अधिक चौकशीसाठी न्यायालयानं अंदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

दाभोलकर, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून! सीबीआयचा दावा
SHARES

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने एटीएस अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केलेला आरोपी सचिन अंदुरे याला पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने रविवारी ३० आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांची हत्या एकाच पिस्तुलानं करण्यात आल्याचा दावा रविवारी सीबीआयने न्यायालयात केला. त्यामुळं अधिक चौकशीसाठी न्यायालयानं अंदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.


कशी झाली होती अटक?

राज्यात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेले वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. त्यापैकी शरदच्या चौकशीतून सचिन अंधुरे याला डाॅ. दाभोलकर यांची हत्या केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली.



सीबीआयचा दावा काय?

आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्याची माहितीही सीबीआयने न्यायालयात दिली. याबाबत अहवाल अजून यायचा बाकी असल्याने सचिन अंदुरेची अाणखी चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलानं केली. सीबीआयच्या वकीलाची ही मागणी मान्य करत न्यायालयानं अंदुरेच्या पोलीस कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली.


शस्त्रसाठा हस्तगत

सचिनच्या अटकेनंतर त्याचा मित्र आणि भावाच्या घराची सीबीआयने झडती घेतली होती. त्यावेळी दोघांच्याही घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये ७.६५ बोअरवेलचं पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे, तलवार आणि एक कट्यार जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाचे धागेदोरे नालासोपारा प्रकरणाशी मिळत असल्याने या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पुढं यातूनच दाभोलकर हत्येचा उलगडा होत गेला.



ही वाचा-

नालासोपारा स्फोटकप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

सचिन अंधुरेच्या भावाच्या घरीही शस्त्रे सापडली



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा