नालासोपारा स्फोटकप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक


नालासोपारा स्फोटकप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक
SHARES

नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसने घाटकोपरच्या भटवाडी परिसरातून आणखी एकाला अटक केली अाहे.  अविनाश पवार (३०) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. न्यायायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अाहे.


गुंता सोडवण्यात यश 

राज्यात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना काही दिवसांपूर्वी एटीएसने अटक केली. त्यावेळी पोलिसांनी वैभव राऊतसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली. शरदच्या चौकशीतून पुढे सचिन अंधुरे या डाॅक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला अटक करण्यात अाली. त्याचबरोबर घातक शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्या श्रीकांत पांगरकर याला अटक केल्यानंतर हा गुंता हळूहळू सोडवण्यात  पोलिसांना यश आले.


काळेच्या चौकशीतून उघडकीस 

कर्नाटकात कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अमोल काळेला अटक केली. काळेच्या चौकशीतून हे सर्व पुढे आले. पुरोगामी विचारवंताच्या हत्यासत्रात या आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौकशीतून घाटकोपर येथील अविनाश पवार याचं नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. चौकशीत त्याचाही सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला स्फोटकांच्या गुन्ह्यात अटक केली आहे.



हेही वाचा -

तासगावमधून पाच जण ताब्यात; एटीएसची कारवाई

नोकरीच्या आमिषाने 93 लाखांना गंडा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा