तासगावमधून पाच जण ताब्यात; एटीएसची कारवाई


तासगावमधून पाच जण ताब्यात; एटीएसची कारवाई
SHARES

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह पुरोगामी विचारवंताच्या हत्या सत्राच्या तपासाचा भाग म्हणून शुक्रवारी दहशतवाद विरोधी पथकाने तासगावमधून पाच जणांना ताब्यात घेतलं अाहे.  त्यांचा विघातक संघटनांशी संबंध असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिस आणि नालासोपारा प्रकरणातून पुरोगामी नेत्यांची हिटलिस्टच पुढे आली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.


ठिकठिकाणी छापेसत्र सुरू 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पाच वर्षापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा.कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. या सर्व हत्यांच्या तपासाला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासामुळे गती मिळाली आहे. एटीएसने नालासोपारा येथे कारवाई केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एटीएसने अटक केलेल्या तीन आरोपींच्या चौकशीतून दाभोळकरांचा मारेकरी सचिन अंधुरे याचे नाव पुढे आले. संशयित आरोपी सचिन प्रकाशराव अंधुरे याला औरंगाबाद येथे सीबीआयने तातडीने अटक केली. त्यानंतर सीबीआय आणि एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापेसत्र सुरू आहेत.


स्थानिक पोलिस अनभिज्ञ

या प्रकरणात शुक्रवारी सकाळी मुंबईतील एटीएस पथकाने तासगावात छापे टाकले. तीन तासांत पाच संशयितांची सखोल चौकशी करून रात्री उशीरा त्यांना ताब्यात घेतल्याचं समजतं. त्या पाचही जणांची नावे अद्यापही समोर आली नाहीत. मात्र त्यानंतर तासगावमध्ये चर्चेला उधाण आले. स्थानिक पोलिस या छाप्यांबाबत अनभिज्ञ होते.



हेही वाचा -

रईस चित्रपटातून ड्रग्ज तस्करीची कल्पना; तस्कराला अटक

बेस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न



 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा