रईस चित्रपटातून ड्रग्ज तस्करीची कल्पना; तस्कराला अटक

डी.एन.नगरमधील तस्कर शाळकरी मुलांच्या मदतीने अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.चूहा या शाळकरी मुलांना चाॅकलेट, खाऊ देऊन त्यांच्यामार्फत अंमली पदार्थांची तस्करी करायचा. काॅलेजमधील तरुणांना निर्जनस्थळी बोलावून शाळकरी मुलांच्या मदतीने चूहा नावाचा तस्कर तस्करी करायचा.

रईस चित्रपटातून ड्रग्ज तस्करीची कल्पना; तस्कराला अटक
SHARES

रईस चित्रपटात शाहरूख खान दारूच्या तस्करीसाठी लहान मुलांचा वापर करतो, असं दाखवण्यात अालं अाहे. हे  दृश्य पाहून डी.एन.नगरमधील तस्कर शाळकरी मुलांच्या मदतीने अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आसिफ इकबाल खान उर्फ चूहा असं या आरोपीचं नाव असून एएनसी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली आहे.


अनेक दिवसांपासून पाळतीवर

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात एएनसीच्या पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे तस्कर विविध शकली लढवत आहेत. चूहावर मागील अनेक दिवसांपासून पोलिस पाळत ठेवून होते. मात्र, तो अंमली पदार्थांची तस्करी पोलिसांची नजर चुकवून करायचा. अंधेरी परिसरात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात असून खरेदी करणाऱ्यांमध्ये काॅलेजच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं अाढळून अालं होतं.


शाळकरी मुलांची टीम

 पोलिसांनी आवळलेल्या फासामुळे चूहाचा धंदा बसला होता. नेमका त्याच वेळी रईस हा शाहरूख खानचा रईस चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरूख शाळकरी मुलांची मदत दारूच्या तस्करीसाठी घेतो. शाळकरी मुलांची कुणीही चौकशी करत नाही किंवा त्यांच्यावर कुणाला संशयही येत नसल्याचे दृश्य यात दाखवलं होतं. चूहाने अशीच शक्कल लढवत आपल्या परिसरातील खोडकर शाळकरी मुलांची एक टीम बनवली होती. 


५८ ग्रॅम एमडी जप्त

चूहा या शाळकरी मुलांना चाॅकलेट, खाऊ देऊन त्यांच्यामार्फत अंमली पदार्थांची तस्करी करायचा. काॅलेजमधील तरुणांना निर्जनस्थळी बोलावून शाळकरी मुलांच्या मदतीने चूहा तस्करी करायचा. याची माहितीएएनसीचे पोलिस उपायुक्त शिवदिप लांडे यांना मिळाली. त्यानुसार लांडे यांनी सापळा रचून अंधेरीतील गावदेवीत मुलांना अंमली पदार्थ देतानाच चूहाला पकडले. त्याच्याजवळ पोलिसांना ५८ ग्रॅम एमडी मिळाले. या पूर्वीही २०१२ मध्ये तस्करीत चूहाला बेड्या ठोकल्या होत्या.



हेही वाचा -

बेस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न

गांजा तस्कर महिलांना एएनसीने ठोकल्या बेड्या



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा