नोकरीच्या आमिषाने 93 लाखांना गंडा

रेल्वेत भरती करून देण्याच्या नावाखाली 93 लाखांना गडवणाऱ्या दोघांना एमआरए पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी अन्य 5 ते 6 जणांकडून लाखो रुपये उकळल्याची बाबही पुढे आली आहे. त्याअनुषंगाने एमआरए पोलिस अधिक तपास करत आहेत.

नोकरीच्या आमिषाने 93 लाखांना गंडा
SHARES

रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून 93 लाखांना गडवणाऱ्या दोघांना एमआरए पोलिसांनी अटक केली आहे. रुफूस दांबले आणि मनजित सिंग चिलोत्रा अशी या दोघांची नावं आहेत. रेल्वेत भरती करून देण्याच्या नावाखाली या दोघांनी अन्य 5 ते 6 जणांकडून लाखो रुपये उकळल्याची बाबही पुढे आली आहे. त्याअनुषंगाने एमआरए पोलिस अधिक तपास करत आहेत.


संपूर्ण प्रकार

वसई परिसरात विमा उकरवून देण्याचं काम करणारा दांबले हा काही कारणास्तव दिल्लीला गेला होता. तेथे एका मित्राने त्याची ओळख मनजित याच्यशी करून दिली. मनजित हा प्रॉपर्टीचं व्यवहार करतो. त्यावेळी मनजितने आपली रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी आणि त्यांच्या पीएशी चांगली ओळख आहे. त्यामुळे येत्या रेल्वे भरतीत आपण अनेकांना रेल्वेत नोकरी मिळवून देणार असल्याचं सांगितलं. त्यानुसार ओळखीचे कुणी असतील तर त्यांची नावं द्या. मात्र त्यासाठी त्यांना काही लाख भरावे लागतील, असं मनजितने दांबळे याला सांगितलं.


पोलिस ठाण्यात तक्रार

मनजितवर विश्वास ठेवून दांबलेने त्याच्या शेजारी राहणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना रेल्वे प्रशासनाकडून 2018 मध्ये निघणाऱ्या भरतीत कामाला ठेवतो असं सांगून 6 जणांकडून लाखो रुपये उकळले. मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यातील प्रवीण गडम याने एमआरए पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


दोघांना पोलिस कोठडी

घाबरलेला दांबलेने वस्तूस्थिती पडताळण्यासाठी मनजितबाबत रेल्वे मंत्र्यांना मेल करून घडलेला प्रतार सांगितला. या घटनेची दखल घेत रेल्वे मंत्रालयातून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून मनजित आणि दांबलेला अटक केली. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा - 

तासगावमधून पाच जण ताब्यात; एटीएसची कारवाई

बेस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा