१६ लाखांच्या एमडीसह ३ नायझेरियनला अटक


१६ लाखांच्या एमडीसह ३ नायझेरियनला अटक
SHARES

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायझेरियन तस्करांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी या नायझेरियन तस्करांची धरपकड सुरू केली. दरम्यान माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या तीन नायझेरियन तस्करांंना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून १६ लाखांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केलं आहे.


३३२ ग्रॅम कोकेन जप्त

कॉर्फर्ड मार्केटपासून काही अंतरावर असलेल्या बॅलार्ड पिअर इस्टेट येथे तीन नायझेरियन एका टॅक्सीत संशयितरित्या बसले होते. बहुदा ते ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली आसता त्या तिघांजवळ ३३२ ग्रॅम कोकेन आढळून आलं. ज्याची बाजारात किंमत १६ लाख ६० हजार इतकी आहे.


तिघे पोलिसांच्या ताब्यात

या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत, त्यांच्यावर कलम ८ (क), सह (२१) (क), २९ एनडीपीएस कायदा १९८५ नुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. हे ड्रग्ज त्यांनी कुठून घेतलं आणि कुणाला विकणार होते. याप्रकरणी पोलिस सध्या त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा