इमारतीसाठी खोदलेल्या खड्यात ११ वर्षाचा मुलगा बुडाला

इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्यात पोहण्यासाठी उतरलेल्या ११ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चेंबूर येथे घडली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः- प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द, नव्याने प्रक्रिया राबवण्याचे निर्देश

चेंबूरच्या आर सी एफ पोलिस ठाणे हद्दीतील ओंम गणेश नगर येथे डिसर्व बिल्डर यांचे इमारतीचे  बांधकाम चालू होते. त्या ठिकाणी इमारतीचा पाया घालण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्यात पाऊसाचे पाणी साचलेले होते. त्यात जवळपरिसरात राहणारी मुले ही पोहण्यासाठी येत होती. शनिवारी या खड्यात  तेजवीर जसबीर सिंग (११) हा आपल्या मित्रांसोबत पाण्यात पोहण्यासाठी उढी मारली तो परत वर आला नाही तेव्हा त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केला असता. तेथील जवळच्या लोकांनी त्याला बाहेर काडून राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पुढील बातमी
इतर बातम्या