चेंबूरमध्ये घराची बाल्कनी कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

गुरूवारी पडत असलेल्या पावसात त्या घराची बाल्कनी अचानक कोसळली. त्याखाली तुळसाबाई सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या

चेंबूरमध्ये घराची बाल्कनी कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
SHARES

मुंबईत मागील तीन ते चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोडळीस आलेल्या भिंती, घर, झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. चेंबूर येथे ही गुरूवारी रात्री घराची जिर्ण बालकणी कोसळून एका वृद्ध महिला जखमी झाली होती. या महिलेचा शनिवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तुळसाबाई वामन अंबोरे (५४) असे या मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचाः- Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!

चेंबूरच्या मोनो रेले स्थानकाजवळील महात्मा फुले नगर परिसरात तुळसाबाई या दोन मुलं, सून, नातवंड यांच्यासह रहात होत्या, त्यांनी त्यांचे घर वन प्लस वन असे बनवले होते. गुरूवारी पडत असलेल्या पावसात त्या घराची बाल्कनी अचानक कोसळली. त्याखाली तुळसाबाई सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक मलबा उचलण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. महात्मा फुले नगर परिसरात  झोपडपट्टीचे पुनर्वसनाचे  काम हाती घेण्यात आले होते.  त्यासाठी १५ मार्च रोजी घरे खाली करण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन झाल्याने विकासकाकडून करण्यात येणारे हे काम रखडले. अखेर या ठिकाणी धोकादायक घराचा हा भाग कोसळल्याचे रहिवाशी सांगतात.

हेही वाचाः- 'चाळसंस्कृती'मधील गणेशोत्सव!

तुळसाबाई यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित  केले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा