Advertisement

'चाळसंस्कृती'मधील गणेशोत्सव!

यंदा परेल इथं राहणारे पराग सावंत यांनी चाळसंस्कृतीचा सांगड घालणारा गणेशोत्सव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

'चाळसंस्कृती'मधील गणेशोत्सव!
SHARES

हरवत चाललेल्या 'चाळसंस्कृती'मधील गणेशोत्सव नव्या जोशानं साजरा करण्याची भावना मनात ठेवून यंदा परेल इथं राहणारे पराग सावंत यांनी चाळसंस्कृतीचा सांगड घालणारा गणेशोत्सव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. घरगुती गणपतीसाठी त्यानं हुबेहुब अशी चाळ उभी केलीये. चाळीतील गणेशोत्सव सोशल डिस्टंसिंग राखून कसा साजरा करता येईल याची झलक यात पाहायला मिळते.

पराग सावंतनं साकारलेल्या चाळीतील गणेशमूर्तीजवळ केवळ भटजी आणि आरतीसाठी एक जण उभा आहे. तर चाळीतील प्रत्येकजण आपल्या दारात उभा राहून गणरायाच्या आरतीत सहभागी झालाय. चाळीतील गोष्टींचे बारकावे त्यानं या देखाव्याच्या माध्यमातून टिपलेले पाहायला मिळत आहेत. यंदा गणेशोत्सवावर करोनाचं सावट असल्यानं गणेशोत्सव हा साधेपणानं ही साजरा करता येतो हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे

दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य जगणारे लोक गणपती बाप्पाला आपल्या पोराप्रमाणे सांभाळतात. त्याची सेवा करतात. लहानांपासून मोठ्याची लगबग, वर्गणीची जमावा जमव, मंडपपासून ते विसर्जन पर्यंतची सगळी व्यवस्था नियोजन करणं, बाप्पाच्या दहा दिवसांत खेळले जाणारे सगळे खेळ, त्या प्रत्येक खेळाचा प्रमुख नेमणे, चाळीच्या खोलीतून येणार नैवेद्य तर कार्यकर्त्यासाठी मेजवानी जणू हे बाप्पाचे दहा दिवस जणू एक जल्लोष आणि सुख देऊन जातात.

पराग सावंत

चाळिचा देखाला साकारण्यासाठी परागला त्याचा मित्र वेदांत वायकर आणि इतर मित्रांची देखील साथ मिळाली. विशेष म्हणजे घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करूनच ही संपूर्ण चाळ साकारण्यात आली. यासाठी घरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या, डबे यांचा वापर करण्यात आला आहे. जवळपास एक महिन्याच्या कालावधीत ही चाळ साकारण्यात आली.  




हेही वाचा

टॉमेटो आणि मिर्चीचा वापर करून साकारला बाप्पा

कागदी फुलांपासून साकारले लालबागच्या राजाचे मोझॅक पोर्टेट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा