Advertisement

टॉमेटो आणि मिर्चीचा वापर करून साकारला बाप्पा

यावर्षी फार मोठ्या मूर्तींची स्थापना करण्यात नाही आली. त्यामुळे अनेकांनी घरातच मूर्ती साकारून आपल्या कलेला प्राधान्य दिलं.

टॉमेटो आणि मिर्चीचा वापर करून साकारला बाप्पा
SHARES

यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक बंधनं आली. पण नागरिकांनी देखील अशा परिस्थितीत साधेपणानं का होईना पण गणेशोत्सव साजरा केला. कोरोनामुळे गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवर निर्बंध होते. त्यामुळे यावर्षी फार मोठ्या मूर्तींची स्थापना करण्यात नाही आली. त्यामुळे अनेकांनी घरातच मूर्ती साकारून आपल्या कलेला प्राधान्य दिलं.


कोरोनाचं सावट जरी असलं तरी भाविकांमध्ये उत्साह प्रचंड आहे. कुणी घरातच मातीचा बाप्पा साकारला  तर कुणी घरातच बाप्पाची सजावट केली. कांदिवलीतही बाप्पांचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले. काही विशिष्ट पद्धतीनं बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. कांदिवली इथं राहणारे बालगणेश पिल्ले आणि विजय लक्ष्मी पिल्ले यांनी घरातच वेगळा बाप्पा साकारला. टॉमेटो आणि मिर्चीचा वापर करून त्यांनी घरातच ६ इंचाचा बाप्पा साकारला. 


खरं तर, यावर्षी कोरोना असल्यानं बर्‍याच भाविकांनी बाप्पांची मूर्ती स्वत:च्या घरात वेगेवगळ्या पद्धतीनं तयार केली. टॉमेटो आणि मिर्चीपासून बनलेली ही गणपती पाहून नागरिकांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा