Advertisement

Mumbai Monorail: मुंबईची मोनो पुन्हा रुळावर


Mumbai Monorail: मुंबईची मोनो पुन्हा रुळावर
SHARES

लॉकडाऊनच्या काळात वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळं मुंबईची मोनोची सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु, एखादं वाहन बंद ठेवल्यास त्याच्यात बिघाड होतात. त्यामुळं देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा एक भाग म्हणून मोनोरेलची चाचणी घेतली जात आहे. मागील आठवड्याभरापासून मोनोरेलची चाचणी घेतली जात आहे. चेंबूर ते वडाळा या मार्गावर चाचणीदरम्यान धावणारी मुंबापुरीची आकर्षक अशी मोनो डार्लिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबापुरीतल्या बेस्ट, लोकल, मेट्रोप्रमाणं मोनोरेलची सेवादेखील ठप्प झाली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल थांबली. एक - दोन नव्हे, तर तब्बल अडीच महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेलची सेवा आजही बंदच आहे.

ऐनवेळी जेव्हा मोनो प्रत्यक्षात धावू लागेल; तेव्हा प्रशासनासमोर ऐनवेळी अडचणी येऊ नयेत, म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून मोनोरेलच्या देखभाल- दुरुस्तीची कामे सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरापासून तर मोनोरेलच्या देखभाल-दुरुस्तीनं आणखी वेग पकडला आहे. अडचणी सुरू असतानाच कालांतराने एमएमआरडीएने मोनो स्वत:च चालविण्याचा निर्णय घेतला. 

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि आता भारत-चीन वाद सुरू असतानाच मुंबईतल्या चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणाºया मोनोरेलसाठी दोन चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं रद्द केल्या.



हेही वाचा -

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा