Advertisement

Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!

देशात १ सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत असून या टप्प्यातील गाइडलाइन्स केंद्र सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!
SHARES

देशात १ सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत असून या टप्प्यातील गाइडलाइन्स केंद्र सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. ( Unlock 4 guidelines issued ) या गाइडलाइन्सनुसार राज्यातील नागरिकांना आणखी काही बाबतीत दिलासा मिळणार आहे. 

देशात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा अनलॉकचा चौथा टप्पा असणार आहे. या टप्प्यात तब्बल ५ महिन्यांनंतर मेट्रो सेवा (metro train services ) सुरू होणार आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील ज्या शहरांत मेट्रोसेवा आहे, त्या सर्व मेट्रो सेवा येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणारी मेट्रो सुरू झाल्यावर हजारो नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ट्रेन सेवा (Mumbai local train) सुरू करण्याच्या बाबतीत राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केल्यास व रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यास लोकल चालवण्यात येईल असं मध्य रेल्वेने स्पष्ट केले होतं. त्यामुळे लोकल रेल्वेचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून असणार आहे.

कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्र शासित प्रदेश स्थानिक पातळीवर केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आता कुठेही (राज्य, जिल्हा, विभाग, शहरं आणि गावं ) लॉकडाऊन घोषित करता येणार नाही, असं केंद्राने दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

नव्या गाइडलाइन्सनुसार सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंज, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि इतर कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. या कार्यक्रमांना १०० जणांपर्यंतच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

अनलॉक-४ मध्येही शाळा, कॉलेज, कोचिंग सेंटर आणि शैक्षणिक संस्था बंदच राहतील. त्यामुळे ऑनलाइन आणि डिस्टन्स शिक्षण हाच पर्याय असेल. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत झालेल्या सखोल चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. 

यासोबतच २१ सप्टेंबरपासून खुल्या चित्रपटगृहांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बंदीस्त सिनेमागृह बंदच राहतील.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा