कंगनाा रनौतला न्यायालयाचं समन्स, हजर राहण्याचा आदेश

मुंबईतील एका प्रसिद्ध टिव्ही चॅनेलला मुलाखत देताना, अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोलीने आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी आदित्य पांचोलीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र, कंगना आणि रंगोली सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयाने दोघींना पुढील तारखेला हजर राहण्याबाबत समन्स बजावलं आहे.

गैरवर्तनाचा आरोप 

कंगना रनौतने एका टिव्ही चॅनेलला २०१७ मध्ये मुलाखत दिली हेती. त्यात तिने आदित्य पांचोलीने एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्रास दिला होता असं म्हटलं होतं. एवढ्यावरच न थांबता त्यानेे गैरवर्तनही केल्याचा आरोप कंगनाने केला होता. या प्रकरणी आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात अब्रुु नुकसानीचा दावा केला हेता. तसंच कंगनाने सोशल मिडियावर आदित्यविरोधात अनेकदा कमेंटही केल्या होत्या.

सुनावणीला गैरहजर

 कंगना आणि रंगोली न्यायालयात अनेक सुनावनीसाठी हजर राहत नव्हत्या. त्यामुळे न्यायालयाने अखेर कंगणा आणि रंगोलीला २६ जुलै रोजी तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुनावनीला कंगना उपस्थित राहते का ? या कडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


हेही वाचा  -

मेहुल चोक्सीची नागरिकता होणार रद्द, अँटिग्वा सरकारची घोषणा

दादर स्थानकात महिलेला हृदयविकाराचा झटका, पोलिसांनी वाचवले प्राण


पुढील बातमी
इतर बातम्या