दादर स्थानकात महिलेला हृदयविकाराचा झटका, पोलिसांनी वाचवले प्राण


दादर स्थानकात महिलेला हृदयविकाराचा झटका, पोलिसांनी वाचवले प्राण
SHARES
दादर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी ३० वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या घटनेनंतर गस्तीवरील रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला.  रेल्वे पोलिसांनी तातडीने महिलेला स्थानकातील आकस्मिक रुग्णालयात दाखल केलं. तात्काळ उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.


डब्यातून उतरताना घटना

ही महिला मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी लोकलमधून प्रवास करत होती. दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर महिलांच्या राखीव डब्यातून उतरताना महिलेस हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी दादर रेल्वे पोलिस ठाणेच्या व्हीजीबल पोलिसिंगमध्ये समावेश असलेल्या महिला पोलीस अंमलदारांनी क्षणाचाही विलंब न लावता तसंच स्ट्रेचर व हमाल येण्याची वाट न पाहता तात्काळ महिलेस उचलले. त्यांनी फलाट क्रमांक ६ वरील आकस्मिक रुग्णालय येथे महिलेला नेले. या ठिकाणी महिलेवर प्राथमिक उपचार सुरू केल्याने महिलेचा जीव वाचला. ही महिला सुरक्षित असल्याचं पोलिसांनी सांगितलं.हेही वाचा -

दहा रुपयांसाठी भाजी विक्रेत्यानं केला ग्राहकाचा खून
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा