दहा रुपयांसाठी भाजी विक्रेत्यानं केला ग्राहकाचा खून

सोनीलाल हा १० रुपये वाढीव भावाने मका विकत होता. त्यावेळी दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सोनीलाल आणि मोहम्मद यांच्यात मारामारी झाली.

दहा रुपयांसाठी भाजी विक्रेत्यानं केला ग्राहकाचा खून
SHARES

अवघ्या दहा रुपयावरून झालेल्या वादातून दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाची धारदार सुऱ्याने हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मोहम्मद हानीफ असे या मृत ग्राहकाचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी सोनीलाल नावाच्या विक्रेत्याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत गायकवाड यांनी दिली.  


शाब्दिक वाद

दादरच्या टिळक उड्डाणपूलाच्या खाली सोनीलाल हा सोमवारी रात्री ११ च्या सुमारास मका विकण्यासाठी बसला होता. त्यावेळी मोहम्मद हा मका घेण्यासाठी सोनीलाल याच्याजवळ गेला असता. सोनीलाल हा १० रुपये वाढीव भावाने मका विकत होता. त्यावेळी दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सोनीलाल आणि मोहम्मद यांच्यात मारामारी झाली. त्यावेळी सोनीलालने जवळील चाकूने मोहम्मदवर हल्ला केला.  


चाकू हल्ला

चाकू हल्यात मोहम्मद हा गंभीर जखमी झाल्याचे पाहून सोनीलालने तेथून पळ काढला. त्यावेळी स्थानिकांनी मोहम्मदला उपचारासाठी परळच्या के.ई.एम रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच मोहम्मदचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. हत्येची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  याप्रकरणी  शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा सोनीलालवर नोंदवत त्याला सायन परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा -

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: न्यायालयानं तिन्ही महिला डॉक्टारांचा जामीन अर्ज फेटाळला

मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा