मेहुल चोक्सीची नागरिकता होणार रद्द, अँटिग्वा सरकारची घोषणा

सध्या वेस्ट इंडिज बेटांवरील अँटिग्वा इथं वास्तव्यास असलेल्या चोक्सी याची अँटिग्वा-बार्बुडा देशाची नागरिकता रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी तिथल्या सरकारने घेतला आहे.

मेहुल चोक्सीची नागरिकता होणार रद्द, अँटिग्वा सरकारची घोषणा
SHARES

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला लवकरच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. कारण सध्या वेस्ट इंडिज बेटांवरील अँटिग्वा इथं वास्तव्यास असलेल्या चोक्सी याची अँटिग्वा-बार्बुडा देशाची नागरिकता रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी तिथल्या सरकारने घेतला आहे. 

लवकरच प्रत्यार्पण

अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राॅन यांनी सांगितलं की, चोक्सी याची अँटिग्वा आणि बार्बुडाची नागरिकता रद्द करण्यात येईल. आमच्या देशात आम्ही कुठल्याही आरोपीला सुरक्षित वास्तव्य करण्याची मुभा देणार नाही. सोबतच त्यांना न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा अधिकार देखील राहील. चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी मार्चमध्ये प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसारच भारताच्या ताब्यात सोपवण्यात येईल. 

आजारपणाचं नाटक

मी भारतातून पळ काढला नसून वैद्यकीय उपचारांसाठी अँटिग्वाला आल्याचं स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी चोक्सीने दिलं होतं. चोक्सीने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली असून पूर्णपणे बरा झाल्यावर मी न्यायालयासोमर हजर होईन, असं आश्वासन चोक्सीने दिलं आहे. त्यावर गेल्या सुनावणीत चोक्सी आजारी पडल्याचं नाटक करत असून वेळ पडल्यास एक वैद्यकीय टीम पाठवून त्याला भारतात परत आणू, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं.  

न्यायालयाने चोक्सीचे सगळे वैद्यकीय अहवाल जे.जे रुग्णालयाला सादर करण्याचे निर्देश चोक्सीच्या वकिलाला दिले आहेत. जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या अहवालांची पाहणी करून ९ जुलैला यासंदर्भातील अहवाल बंद लिफाफ्यात सादर करतील. या अहवालाच्या आधारे चोक्सीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 



हेही वाचा-

मेहुल चोक्सीची १५१ कोटींची संपत्ती जप्त

तर, मोदी, मल्ल्या होतील सख्खे शेजारी!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा