PMC बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या (पीएमसी) आणखी खातेदाराचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. फात्तोमल पंजाबी असं मृताचं नाव आहे. पंजाबी यांना मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. ते मुलुंडमध्ये राहत होते. त्यांच्या काॅलनीतील ९५ टक्के लोकांची पीएमसी बँकेत खाती आहेत. 

पीएमसी बँकेचे खातेदार असलेले संजय गुलाटी (५१) यांचा सोमवारी ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता दुसऱ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे. आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याने खातेदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. पैसे काढण्यावर निर्बंध आल्याने अनेक खातेदार तणावात आहेत. बँकेत लाखो रुपये आहेत पण हातात काहीच नाही अशी अवस्था बहुतांश खातेदारांची झाली आहे. 

ओशिवरा येथे राहणारे संजय गुलाटी यांचे पीएमसी बँकेत ९० लाख रुपये अडकले आहेत. पीएमसी बँकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी सोमवारी आंदोलन करुन घरी परतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. संजय यांना मुलावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज होती. मात्र, बँकेतून पैसे काढू शकत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते प्रचंड तणावात होते, असं त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितलं. 


हेही वाचा -

PMC घोटाळा : ९० लाख रुपये अडकलेल्या खातेदाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती


पुढील बातमी
इतर बातम्या