PMC घोटाळा : ९० लाख रुपये अडकलेल्या खातेदाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळा आता खातेदारांचा जीवही घ्यायला लागला आहे. बँकेत मोठ्या प्रमाणावर पैसे अडकल्याने ताण सहन न होऊन बँकेच्या एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

PMC घोटाळा : ९० लाख रुपये अडकलेल्या खातेदाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळा आता खातेदारांचा जीवही घ्यायला लागला आहे. बँकेत मोठ्या प्रमाणावर पैसे अडकल्याने ताण सहन न होऊन बँकेच्या एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी सोमवारी दुपारी तारापूर गार्डन परिसरातील बँकेच्या शाखेसमोर आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या संजय गुलाटी या खातेदाराचा घरी पोहचताच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

ओशिवरा येथील तारापूर गार्डन येथे राहणारे संजय गुलाटी जेट एअरवेजमध्ये नोकरी करत होते. ही नोकरी करत असताना बचत केलेले ९० लाख रुपये त्यांनी पीएमसी बँकेत ठेवले होते. नोकरी गेल्यानंतर या बचतीच्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणत खातदारांना पैसे काढण्यावरही मर्यादा घातली. त्यामुळे बँकेच सर्वच खातेदार तणावात होते. 

सोमवारी अनेक खातेदारांनी एकत्र येत तारापूर गार्डन येथील बँकेच्या शाखेसमोर निदर्शने केली. या आंदोलनात संजय गुलाटी हे पण सामील झाले होते. आंदोलन संपल्यानंतर ते साडेतीन वाजता आपल्या घरी गेले. ४ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी आपल्या पत्नीकडे जेवण मागितलं. जेवण करत असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यांना कोकीळाबेन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं.  ह्रदयविकाराच्या झटक्याने गुलाटी यांचा मृत्यू झाला. पीएमसी बँकेच्या ओशिवरा येथील शाखेत गुलाटी यांचे ९० लाख रुपये अडकले आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. 


हेही वाचा -

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा