Corona Infected police वेदनादायक! आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू, आकडे चिंता वाढवणारे

महाराष्ट्रात कोरोना महामारीने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली असताना. अत्यावश्यक सेवेतील पोलिसांना या संपूर्ण परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे राज्यातीलतब्बल ७१ पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्याच मुंबई पोलिस दलातील पोलिसांची संख्या ही सर्वाधिक म्हणजेच आहे. दरम्यान भांडुप पोलिस ठाण्यातील ४६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिस दलातील कोरोना बाधीत पोलिसांवरील उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचाः- Devendra fadnavis: मुंबईत ८०६ रुग्ण आढळल्यावर थोडं बरं वाटलं, पण खरं कारण वेगळंच- फडणवीस

 भांडुप पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी ४ जुल रोजीआजारी पडल्यामुळे ५ जुलैपासून रजेवर गेले होते. ६ जुलैला त्यांच्या मुलाने त्यांना मुंलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तोपर्यंत त्यांची कोरोनाची चाचणी झाली नव्हती. कोरोनासारखी लक्षणं असल्यामुळे अखेर डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालायत दाखल करण्यात आले. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांच्या शरीरातील प्राणवायुची पातळी कमी झाल्यामुळे अखेर मंगळवारी उशीरा त्यांचा मृत्यू झाला. गेल्या चार वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता. बुधवारी त्याचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून त्यात त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना नेमका कोणाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांना विलगी करणार जाण्यास सांगण्यात आले आहे. मृत पोलिसाच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. ते सध्या बदलापूर येथे वास्तव्याला होते.

हेही वाचाः- वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी

दरम्यान पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिस दलात सध्या अँक्टीवर रुग्णांची संख्या १११३ इतकी आहे. त्यात ९९२ हे पोलिस कर्मचारी असून १२१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ७१ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात ५ अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या प्रादुर्भावामुळे पोलिसांमध्ये ही भितीचे वातावरण आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या