Advertisement

Devendra fadnavis: मुंबईत ८०६ रुग्ण आढळल्यावर थोडं बरं वाटलं, पण खरं कारण वेगळंच- फडणवीस

मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra fadnavis: मुंबईत ८०६ रुग्ण आढळल्यावर थोडं बरं वाटलं, पण खरं कारण वेगळंच- फडणवीस
SHARES

मुंबईत मंगळवारी दिवसभरात ८०६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. रुग्णांची संख्या नेहमीच्या तुलनेत कमी असल्याने थोडं बरं वाटलं. पण नंतर त्यामागचं खरं कारण (less corona patients in mumbai due to less covid 19 test says bjp leader devendra fadnavis) कळलं, अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं.

मुंबईतील वाढते कोरोनाबाधित रुग्ण आणि कमी होणाऱ्या कोरोना चाचण्या याकडे देवेंद्र फडणवीस सातत्याने सरकारचं लक्ष वेधत आहेत. नाशिक दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंगळवारी मुंबईत थोडे कमी म्हणजे ८०६ रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटलं. पण नंतर कळलं की मुंबईत मंगळवारी केवळ ३३०० चाचण्या झाल्या आहेत. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल तर सरकारला मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Mira Bhayandar: कमी चाचण्यांमुळेच मिरा-भाईंदरमध्ये वाढताहेत रूग्ण- देवेंद्र फडणवीस

जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला, याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी कोरोनाविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

आता आयसीएमआरने लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. चाचण्यांचे अहवाल २४ तासात कसे येतील, हे सुनिश्चित केलं पाहिजे. लक्षणे असलेल्या रूग्णाच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो. खाजगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा