अनुराग कश्यपच्या मुलीबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट, ओशिवरा पोलिसात गुन्हा

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला अश्लिल भाषेत धमकी दिल्याप्रकरणी अखेर ओशिवरा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अनुराग कश्यपने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचे ट्विटरवर आभार मानले आहेत.

पोलिसांकडून प्रतिसाद नाही

लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अनुराग कश्यपला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनुरागने त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी ट्रोलर्सनी फोटोला अनुसरून अश्लील कमेंट केल्या. या घटनेनंतर अनुरागने ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. मात्र तक्रार नोंदवून कित्येक दिवस उलटले तरी पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

मोदी, फडणवीसांना टॅग

त्यामुळे अनुरागने गुन्हा दाखल करून न घेेेत असल्याची खंत व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र सायबर विभागाचे अभिषेक ब्रिजेश कुमार यांना ट्विटरवर टॅग केेेेले होते. त्याच बरोबर ती अश्लील कमेंटही जोडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी अखेर ओशिवरा पोलिसांना गुन्हा नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.


हेही वाचा -
डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: ३ फरार डॉक्टरांना डीनची नोटीस

गाडीच्या काचा फोडून लूट, सराईत आरोपी अटकेत


पुढील बातमी
इतर बातम्या