गाडीच्या काचा फोडून लूट, सराईत आरोपी अटकेत

गाडीत लॅपटाॅप, आणि कामावरील महत्वाची कागदपत्रे होती. मनिष मुलीच्या बास्केटबाँलच्या मॅचमध्ये व्यस्त असताना. अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीची काच फोडून बँगेतील लॅपटाँप चोरला.

गाडीच्या काचा फोडून लूट, सराईत आरोपी अटकेत
SHARES

मुंबईच्या माटुंगा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप, बॅग, मोबाइल आणि इतर साहित्यांची चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शोएब फरहाद कुरेशी (२२), मोहम्मद अनिस मोहम्मद राईन (२५) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली आहे.


शाळेबाहेर चोरी

मुंबईच्या दादर परिसरात राहणारे मनिष शेट्टी (३९) हे अंधेरी एस.व्ही.रोड परिसरात कामाला आहेत. २४ एप्रिल रोजी मनिष यांच्या मुलीची माटुंगातील डॉन बॉस्को शाळेत बास्केट बॉलची मॅच होती. त्यामुळं मनिष काम संपवून कामावरून थेट शाळेत गेले होते. त्यावेळी शाळेच्या बाहेर त्यांनी गाडी उभी केली होती. त्या गाडीत लॅपटॉप, आणि कामावरील महत्वाची कागदपत्रे होती. मनिष मुलीच्या बास्केटबॉलच्या मॅचमध्ये व्यस्त असताना. अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीची काच फोडून बॅगेतील लॅपटॉप चोरला. मॅच संपवून मनिष गाडीजवळ परत आल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर माटुंगा पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार माटुंगा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.


सीसीटीव्हीची मदत

मुंबईतील माटुंगा या परिसरात  उद्यान, शाळा, महाविद्यालय आणि गल्ल्या असल्यामुळं या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आहे. त्यानुसार, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं या दोघांची ओळख पटवली. हे दोघंही धारावी परिसरातील राहणारे असून यातील शोएब हा सकाळी सेल्समेन म्हणून काम करतो, तर अनिस हा कुठंही कामाला नाही. पोलिसांनी या दोघांवर ३७९, ४२७, ३४ भा.द.वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. 



हेही वाचा -

नेहरू नगर पोलिसांनी दोन तोतया पोलिसांना केली अटक

'परे'वर लवकरच सुरू होणार तिसरी एसी लोकल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा