२ तोतया पोलिसांना अटक

बोलण्याच्या नादात वृद्ध महिलेला वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी नेत होते. या दोघांना वृध महिलेसोबत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयित रित्या पाहिले.

२ तोतया पोलिसांना अटक
SHARES

वृद्धांना रस्त्यात गाठून पोलिस असल्याची बतावणी करून गंडवणाऱ्या सराईत तोतया पोलिसांना नेहरूनगर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष पवार (४५), ओम नागेश चौरे (२८) अशी या आरोपींची नावे आहे. या दोघांवर मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात ११ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिस असल्याची बतावणी

कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरात राहणारी ७५ वर्षीय वृद्ध महिला शिवाजी मैदान परिसरातून जात होती. त्यावेळी संतोष आणि ओम यांनी तिची वाट अडवत पोलिस असल्याची बतावणी केली. तसंच, 'पुढे एक शेटजी साड्या आणि घरगुती साहित्य वाटत असून तुम्ही अंगावरील सोने घालून जाऊ नका. अन्यता तुम्हाला ते साहित्य देणार नाहीत', असं सांगत  ते वृद्ध महिलेला वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी नेत होते. त्यावेळी या दोघांना वृद्ध महिलेसोबत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयितरित्या फिरताना पाहिलं. पोलिसांना पाहताच या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यावेळी पोलिसांनी दोघांना हटकलं असता, ते दोघंही पळायला लागले.


पोलिसांवर हल्ला

त्यावेळी एक पोलिस शिपाई आणि महिला शिपाईनं पाठलाग करत दोघांना पकडलं. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी या दोघांनी पोलिसांवर हल्ला करत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांपुढे ते फार काळ टिकू शकले नाहीत. या दोघांवर कुर्ल्याच्या नेहरू नगर पोलिस ठाण्यात ३५३, ३३२, ४२०, ५११, ३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. पोलिस चौकशीत या दोघांवर एमआयडीसी, कांजूरमार्ग, वाकोला, भांडुप, वर्सोवा, खेरवाडी, दिंडोशी, मालाड, वरळी, गोवंडी, कांदिवली अशा ११ पोलिस ठाण्यात याच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.



हेही वाचा -

मुंबईत तब्बल ४९९ इमारती असुरक्षित

एसटी महामंडळ हॉटेल चालकांकडून आकारणार जादा दर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा