Advertisement

मुंबईत तब्बल ४९९ इमारती असुरक्षित

मुंबईतील ४९९ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामधील बहुतेक इमारती मुंबई उपनगरात आहेत.

मुंबईत तब्बल ४९९ इमारती असुरक्षित
SHARES

पावसाळ्याला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच, मुंबईतील असुरक्षित इमारतींच्या स्तिथीबाबत पुन्हा एकदा महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. कारण, मुंबईतील ४९९ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामधील बहुतेक इमारती मुंबई उपनगरात आहेत. मागील वर्षात ६१९ इमारती असुरक्षित घोषित करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा त्यामध्ये १९ टक्क्यांनी घट झाली आहे.

असुरक्षित इमारती

महापालिकेच्या के (पश्चिम) वॉर्डमधील अंधेरी-जोगेश्वरी (पश्चिम) परिसरातील असुरक्षित इमारतींची संख्या (५१) आहे. विलेपार्ले पूर्व इथं ३८ इमारती असुरक्षित असून त्यांना तातडीनं तोडण्याची गरज आहे. महापालिकेद्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, एल वॉर्डमधल्या कुर्ला परिसरात असुरक्षित इमारतींची संख्या जास्त आहे. मात्र, यंदा येथील ८३ पैकी ६० इमारती बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या आहेत.

३० इमारती धोकादायक

माटुंगाच्या एफ (उत्तर) वॉर्डमधील पंजाबी कॉलनीमध्ये ३० इमारती असून, त्या धोकादायक आहेत. परंतु, या इमारतीमधील रहिवाशांनी याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. वांद्रे पश्चिमच्या एच(पश्चिम) वॉर्डमध्ये २९ आणि वांद्रे पूर्व इथं २३ असुरक्षित इमारती आहेत.

४० टक्क्यांपेक्षा जास्त दुरुस्ती

एखाद्या इमारतीस ४० टक्क्यांपेक्षा जास्त दुरुस्ती करणे आवश्यक असेल, तर ती इमारत सी १ श्रेणीमध्ये येते. त्यामुळं महापालिका संपूर्ण इमारतीच तोडकाम करून ती पुन्हा दुरुस्त केली जाते. कारण इमारतीच्या दुरुस्तीकरीता जास्त खर्च येतो. याप्रकरणी, पालिकेनं अनेकदा इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. परंतु, रहिवाशी पालिकेच्या नोटीसला विरोध करतात.



हेही वाचा -

'परे'वर लवकरच सुरू होणार तिसरी एसी लोकल

मोदींविरोधात अपमानास्पद मीम, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसात तक्रार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा