अर्णबसह इतर दोन आरोपींना १४ दिवसांची पोलिस कस्टडी

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक याच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे Republic TV editor संपादक अर्णव गोस्वामी Arnab goswami यांच्यासह दोन जणांना काल अलिबाग पोलिसांनी अटक केली. गुरूवारी सकाळी या तिघांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे अर्णवच्या संपूर्ण कुटुंबियांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अर्णवने ज्या वेळी त्याचे रिपब्लिक चॅनेल सुरू केला. त्या चॅनेलचे सेट उभारण्याचे काम त्याने  इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांना दिले होते. मात्र ठरल्याप्रमाणे काम करून सुद्धा अर्णवकडून अन्वय नाईक यांचे ८३ लाख रुपये थकवले. त्यासाठी अन्वय यांनी वारंवार अर्णवशी भेटून चर्चा केली. मात्र कोणतेही उत्तर न मिळाल्याने नाईक यांनी त्यांच्या अलिबाग येथील बंगल्यात आत्महत्या केली. अन्वयच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर त्यांना प्रथम ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हजर केले. तेथून त्यांची रवानगी अलिबागला करण्यात आली.

हेही वाचाः- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अलिबाग जिल्हा दंडाधिकारी कोर्टाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णवने आपल्याला न्यायालयाच्या नियमांचे उल्लघंन करून पोलिसांनी अटक केली. तसेच मारहाणही केली असून मुंबई पोलिस दलातील ९ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन अर्णवने केले आहे.  

हेही वाचाः- Diwali 2020: दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या