फसवणूक झालेल्या ओला प्रवाशांना पुन्हा मिळणार पैसे, अशी झाली होती फसवणूक

ओला अॅपमध्ये केलेल्या हेरफेरमुळे मुंबईत ओव्हर चार्ज झालेल्या जवळपास ७००० ओला वापरकर्त्यांना आता परतावा मिळेल, अशी माहिती समोर येत आहे.

मुंबई पोलिस गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास केला आहे. ते म्हणाले की, ओला यांनी आतापर्यंत १ हजार २०० हून अधिक वापरकर्त्यांचे सुमारे दीड लाख रुपये परत केले आहेत. तर अन्य वापरकर्त्यांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

गुन्हे शाखेनं १ नोव्हेंबर २०२० रोजी ३ ओला चालकांना अटक केली. या तिघांवर ओला अ‍ॅपमध्ये हेरगिरी करण्याचा आरोप होता. दोषींनी सांगितलं की, ते ओला अ‍ॅप बंद करायचे आणि उड्डाणपुलांच्या खाली ते पुन्हा सुरू करायचे. अ‍ॅपमधील त्रुटी यामुळे वापरकर्त्यांना वास्तविक भाड्यापेक्षा अधिक पैसे देण्यास भाग पाडले जायचे.

गुन्हे शाखेत (युनिट १) संबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुमारे ७००० ओला वापरकर्त्यांचा डेटाबेस तयार केला गेला आहे. “त्यानुसार, अतिरिक्त शुल्क आकारलेली रक्कम अ‍ॅप वापरणार्‍या ग्राहकांना परत करण्यात आली आहे.

परताव्याची रक्कम यूपीआयद्वारे तसंच त्या व्यासपीठाद्वारे देण्यात येईल. ज्यांनी रोख पैसे भरले होते त्यांच्याकडून परताव्यासाठी कंपनीशी संपर्क साधला जात आहे, ”अधिकाऱ्नं पुढे स्पष्ट केलं.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी या तीन वाहनचालकांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. तर या घोटाळ्यामध्ये ३३ अतिरिक्त वाहनचालकांचा सहभाग असल्याचं नमूद केलं होतं. असं नोंदवलं गेलं आहे की, ओला अ‍ॅप अद्यतनित करण्यात ड्रायव्हर्स अपयशी ठरले जेणेकरून ग्राहकांना जास्त पैसे भरावे लागले.


हेही वाचा

पुढील महिनाभरात सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी

मुंबई लोकलच्या दारावर तरूणानं टेकलं डोकं, आनंद महिंद्रा झाले भावूक

पुढील बातमी
इतर बातम्या