१ फेब्रुवारीपासून मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सेवा सामान्यांसाठी सुरू झाली आहे. तब्बल १० महीन्यानंतर लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वाचावरण आहे.
दरम्यान, एक फोटो समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी ट्रेनच्या पाया पडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो मुंबईतील सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवरील असून, एक फेब्रुवारीला घेतलेला आहे.
या फोटोला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. आनंद यांनी या फोटोला भारताची आत्मा म्हटलं आहे. सोशल मीडियावर आनंद यांनी लिहीलं की, 'भारताची आत्मा... याला आपण कधीही गमावणार नाही अशी मी प्रार्थना करतो.'
The soul of India... I pray we never lose it... https://t.co/Xw48usPnew
— anand mahindra (@anandmahindra) February 3, 2021
रेल्वेनं सामान्य नागरिकांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी दिली. परंतु, यासाठी काही ठराविक वेळ ठरवण्यात आली आहे. सामान्य नागरिक सकाळी ७ ते १२ पर्यंत आणि संध्याकाळी ४ ते ९ दरम्यान लोकलनं प्रवास करू शकतो.