आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी स्थगित, पुढील सुनावणी...

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारी होणार आहे.

आर्यन खान जामीन अर्जावरील आजची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. उद्या दुपारी २.३० वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. 

मंगळवारी त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात  सुनावणी झाली. आर्यन खानच्या वतीनं भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी कोर्टात युक्तीवाद केला.  

आज झालेल्या सुनावणीत माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, आर्यन खानला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. 

तसंच आर्यन खान विरोधात कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

रोहतगी म्हणाले की, आर्यन खानला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की, आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. 

आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला आहे.

पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा NCBनं केला आहे. याच कारणामुळे हा जमीन नाकारला जावा, अशी मागणी NCBनं केली.

तसंच NCB चा आरोप आहे की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी पंच साक्षीदारांवर प्रभाव टाकला आहे आणि Aryan Khan चा जामीन अर्ज केवळ याच आधारावर फेटाळला जाऊ शकतो, असं कोर्टात NCBकडून सांगण्यात आलं होतं.

तर आर्यननं मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, तो पंच प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही.

आर्यन खाननं दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही.

शाहरुख खाननंही जामीन मिळवण्यासाठी करंजावाला अँड कंपनी या लॉ फर्मला मैदानात उतरवले आहे. वकिलांच्या या फौजेत रुबी सिंग आहुजा, संदीप कपूर, आनंदिनी फर्नांडिस आणि रुस्तम मुल्ला यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

२० ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर आर्यन खाननं तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.


हेही वाचा

आम्हाला जाळून टाकू, मारून टाकू अशा धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण; प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, धक्कादायक व्हिडीओ समोर

पुढील बातमी
इतर बातम्या