आम्हाला जाळून टाकू, मारून टाकू अशा धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर

NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच आपली चुप्पी तोडली आहे.

आम्हाला जाळून टाकू, मारून टाकू अशा धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर
SHARES

NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच आपली चुप्पी तोडली आहे. आम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, असं क्रांती रेडकरनं सांगितलं.

क्रांती रेडकरनं पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिनं समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली.

आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीनं सांगितलं.

त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे सरकारचे आभारी आहोत. आमच्याकडे कोणी पाहत असले तरी भीती वाटते. फेक अकाऊंटवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं.

पुढे ती म्हणाली, आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे. एक ट्विटरसारखं माध्यम आहे तर उद्या कोणीही उठून काहीही लिहील. आम्ही तुमचा सन्मान करतो. तर तुम्ही तसं वागा, असा खोचक सल्ला क्रांतीनं नाव न घेता नबाव मलिक यांना दिला.

वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रं तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे लोकं सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटं आहे, असं तिनं सांगितलं.हेही वाचा

समीर वानखेडेंवर लावलेल्या आरोपांवर क्रांती रेडकर म्हणते...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा