आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण; प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, धक्कादायक व्हिडीओ समोर

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता नवं वळण लागताना दिसतं आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण; प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, धक्कादायक व्हिडीओ समोर
SHARES

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता नवं वळण लागताना दिसतं आहे. या प्रकरणी नवा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे.

शिवाय, यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने या कथित व्हिडीओत केला आहे.

प्रभाकर साईलनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत के. पी. गोसावीचा वरील व्हिडीओ आपणच काढल्याचा दावा केला आहे. प्रभाकर साईलने तो के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओत 'आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथं ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठिमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितलं तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली', असं प्रभाकर साईल यांनी म्हटलं.

“या बैठकीत त्यावेळी काय झालं हे मला समजलं नाही. गाडीमधून पुन्हा त्यांनी फोन केला की २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. तसेच १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मी एवढं त्यांचं फोनवरचं संभाषण ऐकलं,” अशी माहिती प्रभाकर साईलनं दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा