वडाळा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, आरोपी अटकेत

वडाळा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या  टोळीचा  वडाळा टी टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळून पोलिसांनी एक देशी कट्टा आठ जिवंत काडतूस चॉपर हस्तगत केले आहेत. वडाळा परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात हे आरोपी होते. मात्र दरोडा टाकण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या...

हेही वाचाः- अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करणं हा हिंदुत्वाचा अपमान - संजय राऊत

धारावीच्या कल्याण वाडी परिसरात आरोपी नौशाद अली अकबर अली शेख ३४, अमीर अहमद रईस इद्रसी २६, वसीम रजा अहमद इद्रसी ३२ अशी या आरोपींची नावे आहेत. वडाळा परिसरातील मेट्रो स्टेशनजवळील नारायण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी हे आरोपी आले होते. वडाळा टी टी चे पोलीस रात्री गस्तीवर असताना त्यांनाही आरोपी संशयास्पद फिरताना आढळून आले.  पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर दोन आरोपींनी तेथून पळ काढला. तर इतर तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या आरोपींच्या अंग झडतीत पोलिसांना त्यांच्याजवळ एक देशी कट्टा आठ जिवंत काढतूस, चोपर अशी घातक  शस्त्रे  मिळाली. याप्रकरणी  वडाळा टी टी पोलिसांनी तीनही आरोपींवर ३९२,४०२ भादवी कलमांसह, ३७(१)(अ)१३५  अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश पासलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक वाघमारे, मोरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय बिराजदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तांबे, पोलिस शिपाई भोसले, देशमुख, पवार यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. या आरोपींच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस  घेत आहेत.

हेही वाचाः- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 'त्या' पत्राला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

दरम्यान शासनाने लॉकडाऊन शिथिल करताच शहरामध्ये चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मुंबईत दरोडे टाकण्यासाठी आलेल्या अशाच तीन टोळ्यांच्या मुसक्या रविवारी मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. विशेष म्हणजे यातील दोन टोळ्यातील आरोपींकडे पोलिसांनी बंदुक आणि जिवंत काडतुसेही आढळून आली आहेत. तीनही टोळीतील आरोपींवर या पूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या