Advertisement

अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करणं हा हिंदुत्वाचा अपमान - संजय राऊत

अयोध्येतील राममंदिर आणि हिंदुत्वावरुन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत.

अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करणं हा हिंदुत्वाचा अपमान - संजय राऊत
SHARES

अयोध्येतील राममंदिर आणि हिंदुत्वावरुन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद यासाठी एक मोहिम राबविणार आहे. याची सुरुवात येत्या मकरसंक्रांतीपासून होणार आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

'अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे', अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. अयोध्येतील मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत, यावर शिवसेनेनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 'अयोध्येचा राजा प्रभू श्री राम यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलं आहे. न्यायालयाच्या आदेशानं मंदिर निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. तरीही अयोध्याच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे,' अशी टीका त्यांनी केली आहे.

'४ लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार हे लोकांना मान्य नाही. हे ४ लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपवावं,' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

'रामाच्या नावानं बँकेत खातं उघडलं आहे त्यात पुरेसा निधी येतो. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळ्यात आधी दिला आहे, असं नमूद करतानाच, राजकीय प्रचारासाठी असं करणं हा हजारो कारसेवकांचा अपमान आहे,' अशी टीकाही केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा