Advertisement

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 'त्या' पत्राला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

या पत्राला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 'त्या' पत्राला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
SHARES

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात लिहिलेले पत्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांकडं सोपवलं आहे. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सूचना रास्त असून, सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाज घटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री चंद्रकात हंडोरे, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारला जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. दलित व मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक काँग्रेस पक्षानं आयोजित केली होती. या बैठकीत काही मुद्दे चर्चेत आले होते त्यासंदर्भात सोनिया गांधी यांनी पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत.

'आमचे आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमानुसार काम करत आहे. आमच्यातील एकी भाजपला बघवत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस विधाने करत आहेत. येत्या काळात भाजप सोडून कोण कोण महाविकास आघाडीत येते हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल', असं थोरात यांनी म्हटलं. तसंच, काँग्रेस पक्ष नेहमीच दलित, आदिवासी तसंच अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कट्टिबद्ध आहे. या समाज घटकांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमी कार्यरत राहिला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा