भांडुप पोलिस ठाण्यावर संतप्त नागरिकांचा मोर्चा

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

भांडुपमध्ये दोन दिवसात पाच हत्यांच्या घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत दिसत असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

५ हत्यांनी घाबरले भांडुप

फेरीचा धंदा लावण्यावर बुधवारी तिघांनी एका फेरीवाल्यासह त्याच्या दोन मुलांची हत्या केली. या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच प्रेमप्रकरणातून नरेश शेट्टी या तरुणाची हत्या करत त्याचा मृतदेह रिक्षात टाकून एका आरोपीने पळ काढला. या आरोपीला रायगडमधून पकडण्यात पोलिसांना जरी यश आले असले, तरी काही तासांनी शुक्रवारी सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याने एका तरुणाने रामजी राजभर याच्यावर धारदार चाकूने वार केले. राजभर याचा खून झाला. 

एका मागोमाग एक तीन दिवसात पाच हत्यांच्या घटना उघडकीस आल्याने परिसरात भितीचे वातावरण होते. त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पोलिस कोणतेही पाऊल उचलत नसल्याने सोमवारी संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन आपला रोष व्यक्त केला.

हा मोर्चा नसून संतप्त नागरिक राजभर हत्येतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, याची मागणी घेऊन पोलिस ठाण्यात आले होते.

अखिलेश सिंग, पोलिस उपायुक्त, झोन 7


हेही वाचा

भांडुपमध्ये एकाची हत्या, भाजीची गाडी लावण्यावरून वाद

पुढील बातमी
इतर बातम्या