भांडुपमध्ये एकाची हत्या, भाजीची गाडी लावण्यावरून वाद


भांडुपमध्ये एकाची हत्या, भाजीची गाडी लावण्यावरून वाद
SHARES

भाजीची हातगाडी लावण्याच्या वादातून भांडुप पश्चिमेकडील सोनापूर परिसरात सायंकाळी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका जणाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भाडुंप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.


काय आहे प्रकरण?

भांडुप पश्चिमेकडील सोनापूर परिसरातील झकेरीया मस्जिद, झकेरीया कंपाऊंड इथं अब्दुल अली खान (५०) भाजीचा व्यवसाय करतात. ज्या ठिकाणी ते भाजीची गाडी लावतात, त्या जागेवरून त्यांचा काही जणांसोबत वाद सुरू होता.


गाडी लावण्यास मनाई

या वादातूनच रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ३ अज्ञात आरोपींनी अब्दुल खान आणि त्यांची २ मुले सैबाज अब्दुल अली खान (२५) आणि शादाब अब्दुल अली खान यांना सदर जागेवर हातगाडी लावण्यास मनाई केली. या वादावादीचं पुढे हाणामारीत रुपांतर होऊन तिघा आरोपींनी खान बंधूंवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिथून पळ काढला.


आरोपी फरार

ही घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांनी त्वरीत खान बंधूंना उचलून जवळच्या मुलुंड जनरल हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल केलं. मात्र हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच सैबाज खान मृत झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी भादंवि १४/१८ कलम १७४ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा