भीमा-कोरेगाव हिंसाचार: आरोपींना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • क्राइम

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मुंबईतून ताब्यात घेतलेले दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूर येथील प्रसिद्ध वकील सुरेंद्र गडलिंग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्या रोना विल्सन, शोमा शेख तसंच महेश राऊत या ५ जणांना पुणे न्यायालयाने १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी या पाचही जणांना बुधवारी विविध ठिकाणांहून अटक केली होती.

नक्षलवाद्यांसोबत संबंध?

पुणे इथं ३१ डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण करून जमावाला हिंसाचार करण्यास प्रेरित केल्याचा या सर्वांवर आरोप ठेवण्यात आला आहे. शिवाय या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी पैशांची मदत केल्याचे पुरावेही हाती आल्याचा दावा पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

काय आहे प्रकरण?

३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान भीमा-कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवला होता. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या हिंसाचारामागे हिंदूत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यापैकी पोलिसांनी एकबोटे यांना याप्रकरणी अटक केली होती. 


हेही वाचा-

पालघरमध्ये वनगाच शिवसेनेचे उमेदवार- उद्धव ठाकरे

टोपी न घालणारे देताहेत इफ्तार पार्टी- शरद पवार


पुढील बातमी
इतर बातम्या