याप्रकरणी रामनगर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे. रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने वाद होऊन मोटरसायकलवरून आलेल्या तिघांवर चाॅपरने हल्ला ( करण्यात आला. या हल्ल्यात प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे जखमी झाले. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Dombivli) पूर्वेकडील शेलार नाका येथे ही घटना घडली. इंदिरा नगर (येथे राहणारे प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे हे तिघे मोटरसायकलवरून सोमवारी रात्री दावडीच्या दिशेने घरी जात होते. यावेळी रवी लगाडे याची रिक्षा रस्त्यात उभी होती. प्रतीकने रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे प्रतीकचा रवी लगाडे याच्याशी वाद झाला. हा वाद वाढून रवी लगाडे, रमेश घोरणाळ, चंदया जमादार यांनी प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे यांना शेलार नाका येथे गाठलं. त्यांनी तिघांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला.
हल्ल्यात तिघे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतिकला गंभीर दुखापात झाल्याने त्यचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ, चंदया जमादार, रवी लगाडे यांच्याविरोधात गुन्हे (Crime) दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
हेही वाचा -