आता सीबीआयच्या पथकाला क्वारंटाईन करणार नाही- मुंबई पालिका आयुक्त

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणयासाठी आलेल्या बिहार पोलिसांना कोरोनासाठी आखलेल्या नियमावलीखाली पालिका अधिकाऱ्यांनी क्वारनटाईन करण्यात आले. यावरून प्रचंड वादंग निर्माण झाला. बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी तपास कामात अडथळा निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पालिकेच्या मदतीने ही खेळी केल्याचा आरोप केला होता. मात्र आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.  सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी तपासासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आता क्वारनटाईन केलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सुशां सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांनी सुशांतचे वडिल के.के. सिंहयांनी यांनी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे विशेष पथक मुंबईला आले. अवघ्या चार दिवसांत बिहार पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या प्रकरणाशी संबधित गोष्टी मिळवल्या, हीबाब मुंबई पोलिसांना न रुचल्याने त्यांनी तपासात अडथळा आणण्यास सुरूवात केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला. या प्रकणाच्या तपासासाठी आलेल्या आयपीएस अधिकार्याला कोरोनाचे नियम व अटी सांगून क्वारनटाईन करण्यात आले. त्यावरून बिहार सरकारने नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टातही बिहार पोलिसांनी तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला गेला. हे पाहता आता मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी ‘सीबीआयचं पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आलं, तर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. मात्र, सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत येतील तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन पीरियडमधून सूट करु”, असं प्रसार माध्यमांना सांगितलं.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक तयार

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलं आहे. मुंबई पोलीस सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेल, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. “सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष आढळलेला नाही. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचाः- तबलिकी जमात प्रकरणा विरोधात ‘ईडी’ने फास आवळला

पुढील बातमी
इतर बातम्या