तबलिकी जमात प्रकरणा विरोधात ‘ईडी’ने फास आवळला

कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या हजारो तबलिकींचा खर्च कुणी केला, मशिदीपर्यंत प्रवास कसा केला या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात ईडी आहे.

तबलिकी जमात प्रकरणा विरोधात ‘ईडी’ने फास आवळला
SHARES

देशात ऐकीकडे कोरोनाचे सावट असताना, दिल्लीतील तबलिगी जमातीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आलेल्या हजारो तबलिकींमुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास मदत झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता ईडीने आयोजकांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. त्याच कारवाईचा भाग म्हणून ईडीने देशभरात ३० ठिकाणे छापे टाकली. त्यात मुंबईतल्या चार ठिकाणांचा समावेश असल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचाः- गुड न्यूज! गुरूवारपासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी!

कोरोना संकटात दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमानंतर गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर दिल्ली, मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केला होता. मरकजमध्ये हजारो लोक राहत होते. यावेळी त्यांच्या राहण्याखाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता, मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यांतून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. यावेळी त्याचे प्रायोजक कोण होते वा त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला? याबाबींवर ईडी तपास करत आहे मरकज सोडल्यानंतर अनेक लोक देशातील इतर ठिकाणीही गेले होते. त्यांनी दिल्ली ते विविध भागांतील मशिदीपर्यंत प्रवास कसा केला? त्यांचा बस, हवाई वाहतूक, टॅक्सीचा खर्च कोणी केला? असेही प्रश्न ईडीकडून करण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार दैनंदिन व्यवहारात जमात रोख रकमेचा वापर करीत होते.

हेही वाचाः- सरकारला परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाहीच, यूजीसीची न्यायालयात भूमिका

 ही रक्कम कशी मिळाली याचा ईडीकडून तपास केला जाणार आहे. तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जात आहे. मार्च महिन्यात मरकज वसईला होणार होता. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे तो पुढे दिल्लीत घेण्यात आला. पुढे हा मरकज दिल्लीत झाला. त्यावेळी कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात परदेशातून आलेले तबलिगीही सामील झाले होते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा