Advertisement

गुड न्यूज! गुरूवारपासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी!

राज्याची लाल परी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवण्यात येणारी बस गुरूवार २० आॅगस्ट पासून जिल्ह्याच्या बाहेर देखील धावणार आहे.

गुड न्यूज! गुरूवारपासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी!
SHARES

राज्याची लाल परी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवण्यात येणारी बस गुरूवार २० आॅगस्ट पासून जिल्ह्याच्या बाहेर देखील धावणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चाकरमान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. (maharashtra government allows inter district msrtc bus service under mission begin again)

आधीच आर्थिक गाळात असलेल्या ‘एसटी’ला किलोमीटरमागे १० रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. तर पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. जिल्हांतर्गत वाहतूक सुरू असूनही क्षमतेच्या केवळ निम्मेच प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत असल्याने हा तोटा वाढत चालला होता. 

राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी आतापर्यंत एसटीची सेवा अत्यंत मर्यादीत स्वरूपात चालवण्यात येत होती. या एसटी सेवेला केवळ जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा हाेती. परंतु राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन ६ अंतर्गत बुधवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दोन जिल्ह्यांच्या दरम्यान एसटी बस सेवा चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा - एसटी महामंडळ लवकरच सुरु करणार पेट्रोल पंप

यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास इच्छुक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाॅकडाऊनमुळे आतापर्यंत बंद असलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवेला एका अर्थाने सुरूवात होणार आहेत. यातही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. केवळ खासगी वाहनांतून प्रवास करण्यासाठीच यापुढे ई-पास बंधनकारक असणार आहे.

एसटीची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स एजन्सी आणि खासगी वाहनांकडून प्रवाशांची प्रचंड लूटमार झाली. एसटीची सेवा सुरू झाल्यानंतर ही लूटमार थांबण्यास आळा बसेल.

दरम्यान, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवत आहेत. अशातच आता प्रवासी वाहतूकी व्यतिरिक्त एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीनं उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करणार आहे. याबाबत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

हेही वाचा - वेतन रखडल्यानं एसटी मंहामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा