Advertisement

एसटी महामंडळ लवकरच सुरु करणार पेट्रोल पंप

पेट्रोल-डिझेल पंप / एल. एन. जी. पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून, त्याचं संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळ लवकरच सुरु करणार पेट्रोल पंप
SHARES

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवत आहेत. अशातच आता प्रवासी वाहतूकी व्यतिरिक्त एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीनं उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करणार आहे. याबाबत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

या संदर्भातील सामंजस्य करार परिवहन मंत्री, ॲड. अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला. या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल. एन. जी. पंप (liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे.

पेट्रोल-डिझेल पंप/एल. एन. जी. पंप  इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून, त्याचं संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावं लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीनं पर्यायी उत्पन्नाचं मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्यानं सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल / एल. एन. जी. पंप उभारण्यात येणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होणार असल्याचं मत अनिल परब यांनी व्यक्त केले.



हेही वाचा -

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा