Advertisement

वेतन रखडल्यानं एसटी मंहामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला होतं.

वेतन रखडल्यानं एसटी मंहामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट
SHARES

मुंबईसह राज्यभरातील प्रवाशी लांबचा पल्ला गाठण्यासाठी एसटी महामंडळाच्या एसटीनं प्रवास करतात. मात्र, प्रवाशांना कमी दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एसटी मंहामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओडविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला होतं. परंतु, आता ऑगस्ट महिन्याची १७ तारीख उलटून गेली तरी, अद्याप या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेला नाही. सध्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्यानं सर्वांची धावपळ सुरू झाली आहे. अशात वेतन न मिळाल्यानं कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत.

जुलै महिन्याचं वेतन अद्याप मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांची घालमेल सुरू झाली आहे. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी कोरोना व्हायरसमुळं २३ मार्चपासून एसटीची चाकं थांबली. त्यामुळं महामंडळाला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. परिणामी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार रखडले आहेत.

एसटीला दररोज २२ कोटींचे उत्पन्न होतं ते आता ४० लाखांवर आलं आहे. इतर राज्यांमध्ये पूर्ण प्रवासी घेऊन एसटी वाहतूक सुरू आहे. राज्यात सोशल डिस्टन्सिंग पाळून वाहतूक सुरू केली असती तरी २२ प्रवासी घेऊन एसटीला अर्धे उत्पन्न मिळालं असतं. साधारण दररोज ११ कोटी म्हणजे महिन्याला ३३० कोटी उत्पन्न मिळालं असते. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २७० कोटींची आवश्यकता असते.



हेही वाचा -

वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली

स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा