Advertisement

नवीन अटीचा एसटीला फटका, त्यामुळे घेतला 'हा' निर्णय

कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळानं एक अट घातली होती. पण आता या एका अटीमुळे कोकणात जाणाऱ्यांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.

नवीन अटीचा एसटीला फटका, त्यामुळे घेतला 'हा' निर्णय
SHARES

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला होता. पण यासाठी एसटी महामंडळानं एक अट घातली होती. पण आता या एका अटीमुळे कोकणात जाणाऱ्यांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गुरूवारी म्हणजेच १३ ऑगस्टला कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून एकही एसटी सुटू शकली नाही.

कोकणात जाणाऱ्यांसाठी १२ ऑगस्टपासून एसटीच्या गाड्या सोडण्यात येणार होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाकडून सर्व तयारी देखील करण्यात आली. पण नवीन नियमामुळे चाकरमान्यांनी एसटीसाठी बुकिंगच केलं नाही.

हेही वाचा : रेल्वेची खाजगीकरणाकडे वाटचाल, आता मुंबईतही धावणार खाजगी ट्रेन

एसटीची अट आहे की, १२ ऑगस्टनंतर जाणाऱ्यांनी प्रवासाआधी करोना चाचणी करावी. पण एकाच घरातून गावी जाणाऱ्या चार ते पाच जणांना प्रत्येक चाचणीमागे पैसे अदा करताना मोठा भुर्दंडही पडणार आहे. त्यामुळे यापुढे कोकणात जाणाऱ्यांची संख्यादेखिल फारच कमी असू शकते.

याच कारणामुळे १२ ऑगस्ट म्हणजे बुधवापर्यंत मुंबई, ठाणे, पालघरसह अन्य विभागातून १०३ बसेस रवाना झाल्या. ५० बस गट आरक्षणासाठी (ग्रुप आरक्षण) नोंदविल्या गेल्या. मात्र १२ ऑगस्टनंतर ४ ते ५ जणांनी आरक्षण केलं आहे.  परिणामी महामंडळानं कोकणासाठी २१ ऑगस्टपर्यंत गाडय़ा सोडायचं ठरवलं आहे.हेही वाचा

Ganesh Festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय

१२ ऑगस्टनंतरही सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा बंदच

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा