Advertisement

रेल्वेची खाजगीकरणाकडे वाटचाल, आता मुंबईतही धावणार खाजगी ट्रेन

मुंबईतल्या ४० मार्गांवर खाजगी ट्रेन धावणार असल्याचं समोर येत आहे.

रेल्वेची खाजगीकरणाकडे वाटचाल, आता मुंबईतही धावणार खाजगी ट्रेन
SHARES

खासगीकरणाकडे वाटचाल करत रेल्वेनं बरेच निर्णय घेतले आहेत. मुंबईहूनही खासगी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामध्ये हावडा-मुंबईमार्गे बिलासपूर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. रेल्वेनं मुंबईहून ४० मार्गांवर खासगी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी IRCTCनं प्रथम खाजगी ट्रेन लखनऊ आणि दिल्ली दरम्यान चालवण्यास रुरुवात केली.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वेचा देखभालीचा खर्च कमी करणं, नवीन तंत्रज्ञान विकसित करणं, रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करणं, सुरक्षितता पुरवणं हे या योजनेमागील हेतू आहे. IRCTC चालवत असलेल्या तेजस आणि वंदेभारत ट्रेनमध्ये टीटीईची जागा त्यांच्या कर्मचार्‍यांनी घेतली आहे.

भारतीय रेल्वे नेटवर्कवरील १०९ जोडी मार्ग १२ क्लस्टरमध्ये असतील. प्रत्येक ट्रेनमध्ये किमान १६  डबे असतील. या मार्गांवर धावणाऱ्या सर्व गाड्यांचा वेग १६० किमी प्रति ताशी असेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार यातील बहुतांश आधुनिक गाड्या मेक इन इंडिया अंतर्गत भारतात तयाक केल्या जातील.हेही वाचा

१२ ऑगस्टनंतरही सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा बंदच

३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल-एक्स्प्रेस सेवा बंद? रेल्वेने केला खुलासा

Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा