Advertisement

१२ ऑगस्टनंतरही सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा बंदच

१२ ऑगस्टनंतरही मुंबईची लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहील, असं निवेदन रेल्वेनं जाहीर केलं आहे.

१२ ऑगस्टनंतरही सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा बंदच
SHARES

१२ ऑगस्टनंतरही मुंबईची लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहील, असं निवेदन रेल्वेनं जाहीर केलं आहे. म्हणजेच, आगामी काळात केवळ अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांनाच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली जाईल.

रेल्वेनं असं निवेदन दिलं आहे की, पुढील सल्ल्यापर्यंत सर्व मेल/एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्याची मुदतवाढ पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येईल. तथापि, स्पेशल मेल एक्सप्रेस नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे बोर्डानं २५ जून रोजी निर्णय घेतला की मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन, लोकल ट्रेन आणि ईएमयू गाड्या १२ ऑगस्टपर्यंत चालवल्या जाणार नाहीत. यापूर्वी रेल्वे प्रशासनानं १३ मे रोजी दिलेल्या आदेशात सांगितलं होतं की, नियमित गाडीचे बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द केले जात असून प्रवाशांना पूर्ण परतावा मिळेल. या व्यतिरिक्त कोणाकडे १२ ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनमध्ये बुकिंग असेल तर त्याला १०० टक्के परतावा मिळेल.

मात्र, आता रेल्वेनं हा निर्णय १२ ऑगस्टच्या पुढे देखील लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, विशेष मेल आणि एक्सप्रेस गाड्या सुरूच राहतील.



हेही वाचा

३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल-एक्स्प्रेस सेवा बंद? रेल्वेने केला खुलासा

Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट

पश्चिम रेल्वेचं १९५९ कोटींचं नुकसान

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा