Advertisement

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायम

लोकल बंद झाल्यानं त्यांचा आर्थिक खर्च वाढला आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायम
SHARES

मुंबईची लाइफलाइन लोकल ही मुंबईकरांचा कणा असून, दररोज लाखो प्रवाशांनासोबत धावत असते. आजपर्यंत ही लोकल दंगल अथवा पावसाळ्यात रुळावर पाणी साचल्यानं बंद पडली. मात्र, काही तास व काही दिवसांसाठी बंद राहिली. परंतु, मुंबई लोकलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका व्हायरसमुळं लोकल सेवा बंद राहिली, तीसुद्धा तब्बल ३ महिन्यांपर्यंत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं शिरकावं केला. या कोरोनामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईची लाइफलाइन लोकल बंद करण्यात आली. लोकलमधूम एकावेळेला हजराहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळं या संसर्गजन्य व्हायरसची लागण होऊ नये यासाठी लोकल सेवा बंद ठेवण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधी लोकलमधून दररोज ७० लाख प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बंद असलेली लोकल 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १५ जूनपासून लोकलसेवा सुरू झाली. पश्चिम रेल्वे मार्गावर १६० आणि मध्य रेल्वे मार्गावर २०० अशा एकूण ३६० फेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र ही लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली. त्यामुळं इतर कर्मचारी वर्गानं रेल्वेच्या कारभारावर टीका करत नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतीलही काहीच कर्मचारी वर्गाला लोकल सेवेची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणजे नेमके कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळं अनेक प्रवाशी संघटनांनी सामान्य प्रवाशांनाही लोकल प्रवास उपलब्ध करावा अशी मागणी केली. मुंबईत कर्जत, कसारा, कल्याण डोंबिवली व पालघर, डहाणू येथून अनेक कर्मचारी येत असतात. दररोज लोकलनं प्रवास करून कंपनीच्या निश्चित वेळेत पोहोचतात. परंतु, लोकल बंद झाल्यानं त्यांचा आर्थिक खर्च वाढला आहे.

सामान्यांना स्व-खर्चानं कार्यालय गाठावं लागत आहे. त्यामुळं महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळं यासंदर्भात १५ जूनपासून रेल्वे प्रशासनासह पत्र व्यवहार करण्यात आले असून, सामान्यांना आपला खर्च परवडावा यासाठी लोकल सेवा करावी अशी मागणी केल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मागील ३ महिन्यांपासून बंद असलेल्या उपनगरी रेल्वेगाड्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. मात्र, खरच रेल्वेगाड्या सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रेल्वेचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्यानं यात राज्य सरकारला काहीच करता येत नाही. मात्र केंद्र सरकार याबाबत विचार करीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर लोकल धावत असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. सुरुवातीला कमी लोकल सेवेत आणण्यात आल्या होत्या. परंतु, लोकलमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. त्यानुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावर प्रत्येकी ३५० पर्यंत फेऱ्या वाढवण्यात आल्या. दोन्ही मार्गावर मिळून मुंबईमध्ये लोकलच्या ७०० फेऱ्या चालविण्यात येत आहेत. परंतु, यामध्ये सर्वसामान्यांना प्रवास मुभा नाही.

लोकल सुरू झाल्या असल्या तरी निश्चित स्थानकातच त्या थांबत आहेत. त्यामुळं अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळं या इतर स्थानकांवर लोकल थांबवावी व पूर्वीसारखी धीम्या लोकल चालवाव्यात अशी मागणी देखील प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकल सुरू व्हावी यासाठी आम्ही सतत पत्रव्यवहार करत केले. परंतु, आमच्या मागणीला आमदार, खासदार व लोकप्रतिनीधी यांनी सहकार्य केलं नाही.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरीही वाहतूकसेवा मात्र सुरळीत सुरु नाही. लोकलसेवा बंदच असल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी, बस आणि खासगी वाहनानं प्रवास करावा लागत आहे. बससाठी रांगेत ताटकळत उभं राहणे, वाहतूक कोंडी, खासगी बस चालकांनी चालवलेली लूट यामुळे डोंबिवलीकरांच्याही सहनशीलतेचा अंत होत आहे. नालासोपारा येथे चाकरमान्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले, याची पुनरावृत्ती कल्याण-डोंबिवली परिसरातही होऊ शकते, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे. हेही वाचा -

सरकारच्या नियम, अटीचं पालन करत मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार : किशोरी पेडणेकर

कोरोनामुळं अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतला 'हा' निर्णयसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा